3 फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय?| थ्री फेज इंडक्शन मोटरचे प्रकार, रचना आणि कार्य तत्त्व.

ए.सी. सिंगल फेज सप्लाय पध्दती पेक्षा 3 फेजचे युटीलायझेशन मध्ये जास्त फायदे मिळत असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ए.सी. 3 फेज वर चालणाऱ्या मोटर्सचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो. कारण 3 फेज मोटारीची कार्यक्षमता चांगली असते, लोडवर टॉर्क व पॉवर फॅक्टर चांगला असतो, रचना साधी, सोपी व मजबूत असते; दुरुस्तीसाठी या मोटारी सोप्या असतात, चालू करण्यासाठी सोप्या असतात, कायम वेगाने फिरतात, आणि किंमतीने परवडणाऱ्या असतात.

अशा प्रकारे फायदे देणाऱ्या 3 फेज मोटारीचे औद्योगिक क्षेत्रातील भरभराटीमध्ये मोठे योगदान आहे. या पोस्ट मध्ये आपण मोटारीची रचना, कार्यध्दत, प्रकार, उपयोग इत्यादी विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

3 फेज इंडक्शन मोटार(3 Phase Induction Motor) ची व्याख्या

जे यंत्र ए.सी. 3 फेजची इलेक्ट्रीक पॉवरचे मेकॅनिकल पॉवर मध्ये रूपांतर करते. त्यास ए.सी. श्री फेज मोटार असे म्हणतात. इंडक्शनच्या तत्वावर कार्य करणाऱ्या मोटारला इंडक्शन मोटार असे म्हणतात.

3 फेज इंडक्शन मोटारकोणत्या तत्वावर कार्य करते?

जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेंव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. ह्या तत्वावर 3 फेज इंडक्शन मोटार कार्य करते.

समजा एक चुंबक फिरत आहे अशी कल्पना करा, आकृती मध्ये दाखवलेली तबकडी ही शॉर्ट सर्किटेड कंडक्टर सारखी यांत्रिकरित्या फिरु शकेल अशी व्यवस्था केल्यास, चुंबकीय क्षेत्र फिरत असताना, तबकडी कडून चुंबकीय रेषा कापल्या जातात. म्हणून फॅरेडेच्या इलेक्ट्रो मॅग्रेटीक इंडक्शनच्या नियमांनुसार तबकडी मध्ये ई.एम.एफ. निर्माण होऊन एडी करंट वाहू लागतो. एडी करंटमुळे तबकडी भोवती स्वत:च्या चुबकीय रेषा निर्माण होतात. लेझच्या नियमाप्रमाणे तबकडीच्या चुंबकीय रेषा ह्या, मुख्य चुंबकीय क्षेत्राच्या फिरण्याला विरोध करतात, परंतु त्यास पूर्णपणे नष्ट करु शकत नाहीत, म्हणून चुंबकीय क्षेत्राला पकडण्यासाठी तबकडी सुध्दा फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनेच फिरायला लागते. फिरत्या चुंबकीय क्षेत्राचा वेग जास्त असल्याने तबकडी त्या वेगा पर्यंत पोहचू शकत नाही. म्हणजे नेहमी फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या वेगापेक्षा तबकडीचा वेग कमीच असतो.

चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय?

कोणत्याही कंडक्टर मधून विद्युत प्रवाह वाहू लागल्यास त्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.

चुंबकीय क्षेत्र किती प्रकारचे असतात ?

स्थिर चुंबकीय

एकाच किंमतीचे व एकाच दिशेनी निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास स्थिर चुंबकीय क्षेत्र (0->) • असे म्हणतात.असे चंबकीय क्षेत्र बॅटरी सोअर्स पासून मिळते.

पलसेटींग चुंबकीय क्षेत्र

किंमत कमी जास्त होणारे परंतु, • एकाच दिशेने निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास पलसेटींग चुंबकीय क्षेत्र (0->->) असे म्हणतात. असे चुंबकीय क्षेत्र डि.सी. जनरेटरपासून मिळते.

बदलते चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय?

किंमत व दिशा सतत बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास बदलते चुंबकीय क्षेत्र (<->) असे म्हणतात. असे चुंबकीय क्षेत्र ए.सी. सिंगल फेज पासून मिळते.

फिरते चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय ?

किंमत एकच परंतु दिशा बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास फिरते चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात, हे चुंबकीय क्षेत्र ए.सी. 3 फेजपासून मिळते.

फिरत्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती कशी होते? | 3 फेज पासून फिरते चुंबकिय क्षेत्र कसे निर्माण होते?

आपण 3 फेज पासून फिरते चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे निर्माण होते ते पाहू.

आकृती मध्ये तीन फेज वाईंडर्डींगसाठी तीन कंडक्टर एकमेकांच्या 120 अंशात ठेवून चुंबकीय क्षेत्रात फिरवले आहेत अशी कल्पना करा. आकृती  मध्ये तीन फेज वाईंडर्डींग मध्ये निर्माण होणाऱ्या ई.एम.एफ. चा साईनव्हेव डायग्राम दाखवला आहे. आणि आकृती क मध्ये श्री फेज पासून निर्माण होणारे फिरते चुंबकीय क्षेत्र दाखवले आहे.

आकृती मध्ये स्थिती क्रमांक 1वर U फेज मध्ये निर्माण होणारा ई.एम.एफ. शुन्य आहे. V2 मधील करंट पॉझिटीव आहे म्हणून त्यास (+) अशी खुण दाखवलेली आहे. V2 मधील करंट (+) पॉझिटिव असल्यास V1 मधील करंट निगेटिव आहे म्हणून त्यास (●)अशी खुण दाखवलेली आहे. त्याच प्रमाणे W मधील करंट पॉझिटिव Ð आहे व W, मधील करंट निगेटिव ● आहे म्हणून स्थिती कं. 1 वर निर्माण होणारे परिणामी चुंबकिय क्षेत्र आकृतीमध्ये दाखवल्या प्रमाणे येईल. असेच स्थिती कं. 2 ते 7 पर्यंत विचार केल्यास प्रत्येक स्थितीवर निर्माण होणारे परिणामी चुंबकिय क्षेत्र कसे निर्माण होते हे आपणास समजून येईल. हे चुंबकिय क्षेत्र आपली दिशा सतत बदलणारे आहे, मात्र प्रत्येक वेळी त्याची किंमत सारखीच आहे. अशा प्रकारे 3 फेज पासून फिरते चुंबकिय क्षेत्र निर्माण होत असते.

3 फेज इंडक्शन मोटरची रचना कशी असते?

3 फेज इंडक्शन मोटरच्या रचनेत स्टेटर व रोटर असे दोन भाग असतात.

स्टेटर आणि रोटर म्हणजे काय?

स्टेटर म्हणजे स्थिर भाग आणि रोटर म्हणजे फिरणारा भाग असतो.

स्टेटर :- स्टेटर हा योक मध्ये बसवलेला असतो. स्टेटर हा सिलीकॉन स्टिलच्या पातळ पातळ स्टॅपीग्ज् पासून लॅमिनेट करून तयार केलेला असतो. स्टेटरमध्ये बाइंडिंग बसवण्यासाठी स्लॉटस् असतात. हे स्लॉटस क्लोज टाईप, ओपन टाईप आणि सेमी क्लोज टाईप पैकी एका प्रकारचे असतात. त्या स्लॉट्स वाइंडिंग (स्टेटर) मध्ये 3 फेज वाइंडिंग करून वाइंडिंगचे टोके योक वरिल टर्मिनल बॉक्स मध्ये आणलेले असतात.

रोटर:- एका शॉफ्टवर रोटर सुध्दा सिलीकॉन स्टिलच्या पातळ-पातळ स्टैपींग पासून लॅमीनेटेड तयार केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तीरपे स्लॉट्स असतात. त्या स्लॉट मध्ये अॅल्युमिनियम किंवा कॉपरचे जाड – जाड कंडक्टर्स बसवून ते सर्व कंडक्टर्स दोन्ही टोकांकडे अॅल्युमिनियम रिंगने शॉर्ट सर्किटेड केलेले असतात. शॉर्टकेलेल्या रिंगला एंड रिंग असे म्हणतात. अशा प्रकारे शॉर्ट केलेल्या रोटरला स्क्विरल केज रोटर असे म्हणतात. स्क्विरल केज रोटरचा उपयोग केवळ स्क्विरल केज़ इंडक्शन मोटारी मध्येच केला जातो.

डबल स्क्विरल केज रोटर म्हणजे काय ?

या प्रकारच्या रोटर मधील स्लॉट्स मध्ये दोन प्रकारच्या स्क्चिरल केज वाइंडिंग असतात. एक आतील केज वाइंडिंग व दुसरी बाहेरिल केज वाइंडिंग.

स्लॉटच्या तळासी आतील केज वाइंडिंग जास्त जाडीचे अॅल्युमिनियम किंवा कॉपरचे कंडक्टर्स बसवून स्वतंत्र एंड रिंगच्या सहाय्याने शॉर्ट केलेले असतात. त्यामुळे या केज वाइंडिंगचा रजिस्टंस कमी असतो.

स्लॉट्सच्या वरच्या बाजूला म्हणजे इनर केज वाइंडिंगच्या वर ब्रासचे (पितळी) बारिक-बारिक कंडक्टर्स बसवून असतात. म्हणून या वाइंडिंगचा रजिस्टंस जास्त असतो. या प्रकारच्या रोटरचा उपयोग केवळ डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटारमध्ये केला जातो.

वाऊंड रोटर म्हणजे काय?

या प्रकारच्या रोटर साठी पोकळ शॉफ्टवर रोटरची उभारणी केलेली असते. यावर सेमी क्लोज टाईप अथवा ओपन टाईप स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्स मध्ये इनॅमल्ड इंसुलेटेड कॉपरची 3 फेज वाइंडिंग केलेली असते. स्टेटर वाइंडिंग मध्ये जेवढ्या पोलची वाइंडिंग केलेली असते, तेवढ्याच पोलची वाइंडिंग रोटर मध्ये केलेली असते. ही रोटर वाइंडिंग नेहमी स्टार मध्येच जोडलेली असते. रोटर ज्या शॉफ्टवर बसवलेला असतो, त्याच शॉफ्टवर तीन स्लिपरिंग बसवलेल्या स्लिपरिंग्ज् असतात. त्या स्लिपरिंगला रोटर वाइंडिंगची जोडणी के लेली असते. बाहेरून स्टार जोडणी केलेले तीन व्हेरियबल रजिस्टर बशेस मार्फ त स्लिपरिंगला जोडण्यासाठी व्यवस्था केलेली असते.स्टार जोडणी केलेल्या रजिस्टर मार्फत रोटर वाइंडिंग शॉर्ट करता येते.

या प्रकारच्या रोटरचा उपयोग फक्त स्लिपरिंग इंडक्शन मोटारमध्येच केला जाते.

3 फेज इंडक्शन मोटरची कार्यपध्दत

3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला थी फेजचा सप्लाय दिला असता, स्टेटर वाइंडिंग भोवती फिरते चुंबकिय क्षेत्र तयार होते. म्युचल इंडक्शन मुळे स्टेटरच्या चुंबकिय रेषा रोटर कडून कापल्या जातात. त्यामुळे रोटर मध्ये ई.एम.एफ. निर्माण होऊन रोटर मध्ये एडी करंट वाहू लागतो. त्या एडी करंटमुळे रोटर भोवती स्वतःच्या होतात. र्लेझच्या नियमाप्रमाणे, रोटरच्या चुंबकिय रेषा स्टेटरच्या चुंबकिय रेषांच्या फिरण्याला विरोध करतात व त्याच्या वेगा बरोबर येऊन त्यास रद्य करण्याच्या प्रयत्नात रोटरला टॉर्क मिळून रोटरही स्टेटरच्या चुंबकिय क्षेत्राच्या दिशेनी फिरू लागतो. परंतु रोटरचा वेग नेहमी स्टेटरच्या वेगापेक्षा कमीच असतो. अशा प्रकारे 3 फेज मोटरचा रोटर फिरून रोटरच्या शॉफ्टवर यांत्रिक शक्ती मिळूलागते.

3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार

3 फेज इंडक्शन मोटरचे मुख्य दोन प्रकार पडतात.

  1. स्क्विरल केज इंडक्शन मोटर.
  2. स्लिपरिंग इंडक्शन मोटर.

स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे दोन प्रकार पडतात.

  1. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर.
  2. डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर..

सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर

या मोटरचा स्टेटर हा इतर सर्वसाधारण इंडक्शन मोटरच्या स्टेटर सारखाच असतो, व रोटर हा सिंगल स्क्विरल केज प्रकारचा असतो. स्टेटरमध्ये 3 फेज वाइंडिंग करून स्टार अथवा डेल्टा कनेक्शन केलेले असते. या वाइंडिंचे तीन किंवा सहा टोके बाहेर टर्मिनल बॉक्समध्ये आणलेले असतात. जर तीन टोके असतील तर, ते U, V, W असे मार्किंग केलेले असतात, आणि जर सहा टोके बाहेर आणलेले असतील pi*r_{1} * U_{2}, V_{1}*V_{2} W_{1}*W_{2} असे मार्किंग केलेले असतात. या टर्मिनलला सप्लायचे L_{1} L_{2}, L_{3} असे 3 फेजची वायर्स जोडून सप्लाय द्यावयाचा असतो.

सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटारची कार्यपध्दत

स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय दिला असता, स्टेटर मध्ये फिरते चंबकिय क्षेत्र तयार होते. म्युचल इडक्शनमुळे रोटर मध्ये emf निर्माण होऊन एडी करंट वाहू लागतो. त्यामुळे रोटरला टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो व रोटर शॉफ्टवर मेकॅनिकल पॉवर मिळू लागते.

सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे गुणधर्म

  1. रोटर रजिस्टंस कमी असल्याने स्टार्टिंग करंट जास्त घेते. हा करंट जवळपास एकूण लोड करंट पेक्षा 6 ते 10 पट जास्त असतो.
  2. रोटर रजिस्टंस कमी असल्याने स्टार्टिंग टॉर्क कमी असतो.
  3. 3.नोलोडवर जवळ-जवळ सिंक्रोनस स्पीडने फिरते.
  4. नोलोडवर स्लिप कमी असते म्हणून नो लोड टॉर्क सुध्दा कमी असतो.
  5. 5. नो लोडवर पॉवर फॅक्टर कमी असतो, हा साधारणपणे 0.2 ते 0.3 लॅगींग असतो.
  6. 6. लोडवर पॉवर फॅक्टर व टॉर्क हे दोन्हीही सुधारतात. पुर्ण लोडवर पॉवर फॅक्टर जवळपास 0.8 ते 0.85 लॅगिंग असतो.
  7. गती जवळ जवळ कायम असते.

सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटारचा उपयोग कोठे केला जातो?

जेथे उच्च्य् स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता नसते अशा ठिकाणी उदा.वाटर पंप, ड्रिल मशीन, ग्राइंडर, सॉ मशीन, पिठाची गिरणी, ब्लोअर मशीन इत्यादी ठिकाणी या मोटरचा उपयोग केला जातो.

डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर

 या मोटरचा स्टेटर सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या स्टेटर सारखा असतो, आणि रोटर डबल स्क्विरल केज प्रकारचा असतो.

कार्यपध्दत:- जेव्हा स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय मिळतो तेंव्हा, स्टेटर फ्लक्स फक्त रोटरच्या वरच्या कंडक्टर कडून कापल्या जातात, आणि रोटरला टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो. वरच्या केज वाइंडिंगचा रजिस्टंस जास्त असल्यामुळे चांगल्या प्रकारचा स्टार्टिंग टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो. नंतर मोटारजेंव्हा गती घेते तो पर्यंत स्टेटर फ्लक्स रोटरच्या खालच्या केज वाइंडिंग पर्यंत जाऊन कापल्या जातात. खालच्या केज वाइंडिंगचा रजिस्टंस कमी असल्यामुळे रोटर करंट (I_{2}) वाढतो, म्हणून रोटरला रनिंग टॉर्कही जास्त मिळून रोटर फिरू लागतो.

डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटारचे गुणधर्म

  1. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटारपेक्षा स्टार्टिंग करंट कमी घेते.
  2. स्टार्टिंग व रनिंग टॉर्क दोन्हीही चांगले असतात.
  3. पॉवर फॅक्टर चांगला असतो.
  4. गती जवळ-जवळ कायम असते.

डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटारचा उपयोग कुठे केला जातो?

ज्या ठिकाणी चांगल्या स्टाटिंग टॉर्कची आवश्यकता असते, अशा ठिकाणी

उदा. क्रेन, पंचिंग मशीन,प्रेस मशीन,प्लेनर, लिफ्ट,रोलींग मील इ. ठिकाणी या मोटरचा उपयोग केला जातो.

3 फेज इंडक्शन मोटारची फिरण्याची दिशा कश्या प्रकारे बदलता येते?

कोणत्याही इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा बदलावयाची असेल तर मोटरला दिलेल्या सप्लायचा फेज सिक्वेंस बदलावा लागतो.

म्हणजेच मोटारला मिळणाऱ्या तीन फेज पैकी कुठल्याही 2 फेजची अदलाबदल केली तर त्या मोटारची फिरण्याची दिशा बदलते.

स्लिपरिंग इंडक्शन मोटर

या मोटरचा स्टेटर स्क्विरल केज इंडक्शन मोटारसारखाच असतो. रोटर मात्र स्क्विरल केज ऐवजी वाऊंड रोटर असतो. स्टेटर मध्ये जेवढ्या पोलची वाइंडिंग केलेली असते, तेवढयाच पोलची रोटरमध्येही वाइंडिंग केलेली असते. स्टेटर वाइंडिंग साधारणपणे डेल्टा मध्ये जोडलेली असते व रोटर वाइंडिंग नेहमी स्टार मध्येच जोडलेली असते. रोटर वाइंडिंगची जोडणी रोटर शॉफ्ट वर बसवलेल्या स्लिपरिंगला केलेली असते. त्या स्लिपरिंगला बाहेरून स्टार कनेक्टेड व्हेरियबल रेव्होस्टॅट जोडावयाची व्यवस्था केलेली असते. ही मोटारचालू करतेवेळी स्टार कनेक्टेड व्हेरियबल रेव्होस्टॅट पुर्णपणे रोटर सर्किट मध्ये ठेवूनच स्टेटर वाइंडिंगला सप्लाय द्यावयाचा असतो.

स्लिपरिंग इंडक्शन मोटारची कार्यपध्दत

स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय दिला असता, सुरूवातीस रोटर सर्किटचा रजिस्टंस जास्त असल्याने मोटारस्टार्टिंग करंट कमी घेते आणि मोटरचा स्टाटिंग टॉर्क वाढून मोटारचालू होते. मोटारवेगात येऊ लागली की, हळू हळू रोटर रजिस्टंस कमी-कमी करावा लागतो. मोटाररेव्होस्टॅटच्या हँडल मार्फत रोटर वाइंडिंग शॉर्ट करावी लागते. म्हणजे फक्त सुरूवातीस बाहेरिल रजिस्टंस रोटर सर्किट मध्ये असल्याने रोटर रजिस्टंस जास्त असतो व नंतर रनिंग मध्ये ही रोटर स्क्विरल केज रोटर सारखा शॉर्ट सर्किटेड झाल्याने मोटारस्क्विरल केज मोटारसारखी कार्य करू लागते. मोटारपुर्ण वेगात आली असता, व्हेरियेबल रेव्होस्टॅटच्या हँडल मार्फत रोटर वाइडिंग शॉर्ट करावी लागते. म्हणजे फक्त सुरूवातीस बाहेरिल रजिस्टंस रोटर सर्किट मध्ये असल्याने रोटर रजिस्टंस जास्त असतो व नंतर रनिंग मध्ये ही रोटर स्क्विरल केज रोटर सारखा शॉर्ट सर्किटेड झाल्याने मोटारस्क्विरल केज मोटारसारखी कार्य करू लागते.

स्लिपरिंग इंडक्शन मोटरचे गुणधर्म

  1. स्टार्टंग टॉर्क उच्च प्रतीचा असतो.
  2. स्टार्टंग करंट कमी घेते.
  3. पॉवर फॅक्टर चांगला असतो.
  4. लोडवर गती कमी होते.
  5. रोटर सर्किट मध्ये बाहेरून रजिस्टंस जोडून साधारणपणे 5\% पर्यंत गती बदलता येते.
  6.  स्लिपरींगवर स्पार्किंगची शक्यता असते.
  7. रोटर मध्ये IPR पॉवर लॉसेस वाढल्यामुळे कार्यक्षमता कमी असते.
  8. किमंतीने स्क्विरल केज मोटारपेक्षा महाग असते.
  9. चालू करण्यास स्क्विरल केज मोटारपेक्षा किचकट असते.
  10. रचना स्क्विरल केज मोटारपेक्षा किचकट असते.

स्लिपरिंग इंडक्शन मोटरचा उप

केला जातो?

ज्या ठिकाणी उच्च् स्टार्टिटंग टॉर्कची आवश्यकता असते,अशा ठिकाणी उदा.क्रेन, हॉइस्ट, टेक्सटाईल मीलमध्ये अनेक शॉफ्ट एकत्र चालवण्यासाठी, शिअरिंग मशीन, प्लेनर, लिफ्ट, रोलींग मील, पंचींग मशीन इ. ठिकाणी या मोटरचा उपयोग केला जातो.

स्क्विरल केज इंडक्शन मोटारव स्लिपरिंग इंडक्शन मोटारमधील फरक

स्क्विरल केज इंडक्शन मोटरस्लिपरिंग इंडक्शन मोटर
1. यामध्ये स्क्विरल केज रोटर असतो.1. यामध्ये वांऊंड रोटर असतो.
2. स्टारटिंग करंट जास्त घेते. हा जवळपास पूर्ण लोड करंटच्या 6 ते 10 पट जास्त असतो.2. स्टारटिंग करंट कमी घेते. हा जवळपास पूर्ण लोड करंट च्या दुप्पट असतो.
3. रोटर रजिस्टंस कमी असतो3. रोटर रजिस्टंस जास्त असतो.
4. रोटर सर्किट मध्ये बाहेरून रजिस्टंस जोडता येत नाही.4. रोटर सर्किट मध्ये बाहेरून रजिस्टंस जोडता येतो.
5. नो लोडवर पॉवर फॅक्टर कमी असतो, लोडवर पॉवर फॅक्टर सुधारतो.5. दोन्ही लोडवर पॉवर फॅक्टर चांगला असतो.
6. कार्यक्षमता जास्त असते.6. कार्यक्षमता कमी असते.
7. गती जवळपास कायम असते.7. लोडवर गती कमी होते.
8. पोलची संख्या बदलून गती बदलता येते.8. रोटर सर्किट मध्ये बाहेरून रजिस्टंस जोडून 5% पर्यंत बदलता येतो.
9. रचना साधी व स्वस्त असते.9. किचकट असते, महाग असते.
10. चालू करण्यास सोपी असते.10. थोडी सावधानी बाळगावी लागते.
11. देखभालीचा खर्च कमी असतो.11. देखभाल जास्त करावी लागते.
12 कायम वेगासाठी उपयुक्त असते.12. उच्च्स्टाटींग टॉर्कसाठी उपयुक्त असते.
Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!