विजेच्या निर्मितीपासून वीज वापरापर्यंत अखिल भारतीय स्तरावर पुष्कळसे नियम घालून दिलेले आहेत. त्यापैकी किमान काही नियमांविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून येथे भारतीय विद्युत नियम 1956 (आय.ई.आर.) जसेच्या तसे देण्याऐवजी त्यांचा सारांश दिलेला आहे.
लो व्होल्टेज (कमी दाब)
साधारण स्थितीत 250 व्होल्टेज पेक्षा कमी असलेल्या व्होल्टेजला लो व्होल्टेज असे म्हणतात.
मिडीयम व्होल्टेज (मध्यम दाब)
250 व्होल्टेनपेक्षा जास्त व 650 व्होल्टेज पेक्षा कमी व्होल्टेजला मिडीयम व्होल्टेज असे म्हणतात. हाय व्होल्टेज (उच्च दाब) :
650 व्होल्ट पेक्षा जास्त व 33,000 व्होल्ट (33 के.व्ही.) पेक्षा कमी व्होल्टेजला हाय व्होल्टेज असे म्हणतात.
एक्स्ट्रा हाय व्होल्टेज (अती उच्च दाब)
33 किलो पेक्षा जास्त व्होल्टेजला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असे म्हणतात.
भारतीय विद्युत नियम 1956
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (29)
वीज वाहकाच्या उपकरणांची उभारणी, बांधणी, संरक्षण व कार्यव्यवस्था यासंबंधी
सर्व वीज पुरवठा करणाऱ्या लाईन्स, उपकरणे इत्यादी योग्य क्षमतेचे व योग्य आकाराचे असले पाहिजे. त्यांची रचना, उभारणी, संरक्षण, कार्यपध्दती यापासून धोका उत्पन्न होणार नाही अशी असावी. त्यासाठी शक्यतो (आय.एस.आय.) इंडीयन स्टँडर्ड इंस्टिट्युशनने दर्शविलेले प्रमाण पाळले पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (31)
ग्राहकाच्या आवारातील कट-आउट संबंधी
वीज पुरवठा करणाऱ्या कंपनी अथवा मंडळाने वीज ग्राहकांच्या आवारात प्रत्येक सर्व्हस लाईनच्या फेज वायरवर लोखंडी पेटी असलेला कट-आवुट बसवला पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (32)
अर्थ, न्यंट्रल कंडक्टर, स्विचेसचे ठिकाण, कट-आउट इत्यादी ओळखण्या संबंधी
वीज पुरवठा करणाऱ्यांने वीज ग्राहकांसाठी वीज पुरवठा सुरू होण्याच्या जागी न्युट्रल लावून, ती न्युट्रल अर्थांग सिस्टम मध्ये जोडली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा कट-आबूट, लिंक स्विच हे, अर्थ अथवा अर्थ केलेला न्युट्रल कंडक्टरला जोडू नये.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (33)
ग्राहकाच्या आवारातील अर्थड कंडक्टरच्या उपलब्धते संबंधी
मध्यम, उच्च व अतिउच्च व्होल्टेज वापरणारे ग्राहक यांनी आपआपली स्वत: ची वेगळी अर्थींग करून त्याची देखभाल स्वतः केली पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (34)
उघडे कंडक्टर हाताळण्याच्या शक्यते संबंधी
इमारतीच्या आवारात उघडे कंडक्टर वापरले असतील तर त्याच्या मालकाने पुढील प्रमाणे काळजी घेतली पाहिजे.
- (अ) उघड्या कंडक्टर जवळ सहज पोहोचता येणार नाही.
- (ब) त्या उघड्या कंडक्टरचे नियंत्रक स्विचेस हे सहजा सहजी हाताशी पोहोचतील अशा ठिकाणी बसवले पाहिजेत की, जेणेकरून निकडीच्या प्रसंगी त्या कंडक्टर्स मधील करंट वाहणे चटकण् थांबवता आले पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (35)
धोक्याच्या सूचने संबंधी
प्रत्येक मध्यम, उच्च व अतिउच्च व्होल्टेजच्या उपकरणांच्या मालकाने उपकरणांवर हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत धोक्याची सूचना लावावी. अनेक उपकरणे एकाच ठिकाणी असतील तर सर्वांसाठी एकच सूचना पुरेशी आहे. असे उपकरण एखाद्या खोलीत असतील तर, त्या खोलीच्या दारावर एकच सूचना लावावी.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (36)
वीज पुरवठा करणाऱ्या कंडक्टरच्या व विद्युत उपकरणांच्या हाताळणी संबंधी
कोणत्याही विद्युत लाईनवर अथवा उपकरणांवर काम करण्यापूर्वी वा हाताळण्यापूर्वी प्रथम त्यास अर्थ करून डिसचार्ज करावे. काम करतेवेळी पुन्हा चुकीने, अथवा अन्य कारणाने तेथील कंडक्टर चार्ज होऊ नये म्हणून योग्य ती सुरक्षितता पाळून सावधगिरीने काम केले पाहिजे.
(हा नियम कमी व मध्यम व्होल्टेजवर कार्य करणाऱ्या उपकरणांची किरकोळ दुरुस्तीसाठी लागू होणार नाही.)
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (37)
सहज हलविता येणाऱ्या (पोर्टेबल) उपकरणांना लागणाऱ्या केबल संबंधी
पोर्टेबल उपकरणांना सप्लाय देण्यासाठी वापरलेल्या केबल वरील इन्सुलेशन चांगल्या प्रतिचे नसेल, यांत्रिक हानिपासुन सुरक्षित नसतील तर असे केबल बदलल्याशिवाय उपकरण हाताळू नये. जेथे केबल मधिल आवरण धातूचे असेल तर त्या आवरणास, उपकरणांच्या धातूयूक्त बॉडीला व अर्थला विद्युतदृष्ट्या सलगपणे जोडले पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (41)
निरनिराळ्या व्होल्टेजची विद्युत मंडळे ओळखण्या संबंधी
जनरेटींग स्टेशन, सब स्टेशन इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या व्होल्टेजवर कार्य करणाऱ्या उपकरणांच्या सर्किटवर चट्कण ओळखता येतील अशा खुणा त्या-त्या सर्किटच्या उपकरणावर केल्या पाहिजेत.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (42)
विद्युत मंडळाच्या अचानक चार्जिंग संबंधी
एका सर्किटच्या चार्जीगमुळे दुसऱ्या सर्किटवर अथवा उपकरणांवर त्याचा कांहीही परिणाम होता कामा नये. अशा प्रकारे विद्युत संच मांडणीची उभारणी केली पाहिजे.
विद्युत भारतीय (इलेक्ट्रीकल चार्जड्) असतांना एकमेकांशी संयोजीत होणार नाहीत अशी काळजी जेंव्हा एकाच आधारावर ए.सी. व डि.सी. लाईन्स उभारल्या असतील तर अशा लाईन्स घेतली पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (43)
अग्रिशामके वापरण्या संबंधी नियम
प्रत्येक जनरेटींग स्टेशन, सबस्टेशन यामध्ये प्रथमोपचाराची पेटी सहज दिसेल व सहज पोहचेल अशा ठिकाणी ठेवली पाहिजे. पेटीवर योग्य त्या रंगानी योग्य अशी खुण केलेली असली पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (44)
अपघाताच्या सुचने संबंधी
प्रत्येक जनरेटींग स्टेशन, सबस्टेशन, कार्यशाळा इत्यादी मध्ये हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेत “शॉक ट्रिटमेंट चार्ट” लावला पाहिजे. त्या चार्टवर उपचार करण्याविषयी सूचना असल्या पाहिजेत. जर विजेमुळे एखादा अपघात झाला असेल व त्यामुळे मनुष्यास किंवा प्राण्यांस इजा झाली असेल अथवा मृत्यु ओढावलेला असेल तर त्याबद्दलची सूचना 24 तासाच्या आत विद्युत निरीक्षकास दिली पाहिजे व राज्य विजमंडळाने त्या अपघाताचा संपूर्ण अहवाल 48 तासाच्या आत विद्युत निरिक्षकाकडे सादर केला पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (45)
ग्राहक, विद्युत ठेकेदार, वीज़ कर्मचारी आणि वीज पुरवठा करणारी कंपनी यांने घ्यावयाची तजबीज
ज्यांच्या जवळ ठेकेदारीचा अथवा वायरमनचा परवाना (लायसंस) नाही. त्यांना विद्युत उभारणी, संच, मांडणी, वाढवणी, बदल व दुरूस्ती अशा प्रकारची कामे करता येणार नाहीत. परंतु बिगर परवाना धारकांना दिवे, पंखे, फ्युज, स्विच व कमी व्होल्टेजवर चालणारी व घरगुती उपकरणे यांची किरकोळ दुरूस्ती करता येईल.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (46)
ठरविक मुदती नंतर ग्राहकाची उपकरणे व विद्युत संच यांच्या तपासणी संबंधी
ठराविक कालावधी नंतर प्रत्येक इन्स्टॉलेशनची टेस्टींग घेणे आवश्यक आहे. हा कालावधी 5 वर्षा पेक्षा जा असू नये. अशी टेस्टींग वीज पुरवठा करणाऱ्यांने अथवा विद्युत निरिक्षकाने अथवा राज्य सरकारने नेमलेल्या राजपत्रीत सहाय्यक निरिक्षकाने अथवा राज्य सरकार सांगेल त्यांने केली पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (47)
ग्राहकाची उपकरणे व विद्युत संच यांच्या तपासणी संबंधी
एखाद्या इन्स्टॉलेशनला वीज पुरवठा करण्यापूर्वी त्या इन्स्टॉलेशनची टेस्टींग घेणे आवश्यक आहे. ह्या नियमानुसार (म्हणजे नियम 46 प्रमाणे) इन्स्टॉलेशन धोकादायक आहे किंवा नियमानुसार योग्य सुचना देवूनही सुधारणा होत नसेल तर वीजपुरवठा नाकारण्याचा अधिकार विजपुरवठा करणाऱ्यांना प्राप्त होतो.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (48)
विद्युत प्रवाह देण्यापूर्वी विद्युत संच मंडळातील लिकेज करंट संबंधी घ्यावयाची काळजी
ज्या ग्राहकांच्या इन्स्टॉलेशन मधील लिकेज करंट हा त्यांना पुरवलेल्या एकूण करंटच्या 1/5000 पेक्षा जास्त असेल तर कोणत्याही विज ग्राहकास विज पुरवठा न करण्याचा अधिकार वीज पुरवठा करणाऱ्यास आहे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (49)
ग्राहकाच्या हद्दीत होणाऱ्या लिकेज संबंधी
वीज ग्राहकांच्या इन्स्टॉलेशनचा लिकेज करंट हा एकूण करंटच्या 1/5000 पेक्षा जास्त असेल तर त्यास वीज पुरवठा करणारी कपंनी मंडळ 48 तासाची नोटीस देवून वीज पुरवठा बंद करू शकते.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (50)
विजेचा पुरवठा व उद्योग संबंधी
विद्युत पुरवठा हा खालील गोष्टींची तजबीज केल्याशिवाजय विजेचा उपयोग चालू ठेवता कामा नये.
- (अ) ग्राहकांचा विजपुरवठा जेथून सुरू होतो त्या पॉईंटवर शक्यतो जवळ योग्य क्षमतेचा मुख्य स्विच अथवा सर्किट ब्रेकर बसवला पाहिजे; की ज्यामुळे कोणत्याही क्षणी सर्व इन्स्टॉलेशन विजपुरवठ्यापासून अलग करता येईल.
- (ब) प्रत्येक सर्किटवर योग्य क्षमतेचा फ्युज वा सर्किट ब्रेकर बसवले पाहिजे.
- (क) प्रत्येक मोटार वा तत्सम उपकरणे नियंत्रित करण्यासाठी योग्य क्षमतेचे स्विच किंवा ब्रेकर जोडावे की, ज्यामुळे उपकरणावर काम करणारा त्यास सहजपणे हाताळू शकेल.
- (ड) प्रत्येक मशीन मध्ये वापरलेले इन्सुलेशन चांगल्या प्रतिचे असावे. मशीन कार्य करतेवेळी • निर्माण होणारी उष्णता किंवा थंडी याचा परिणाम इन्सुलेशनच्या गुणधमति फार जास्त फरक करणारा असू नये.
- (प) कोणताही जिवंत भाग उघडा ठेवू नये.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (51)
मध्यम, जास्त व अति जास्त व्होल्टेज असलेल्या उपकरणां संबंधी घ्यावयाची काळजी
- (अ) ओव्हर हेड लाईनच्या कंडक्टर्स व्यतिरिक्त सर्व कंडक्टरवर यांत्रिक दृष्ट्या मजबूत असे आवरण असले पाहिजे. जे की, विद्युत व यांत्रिक हानिपासून सुरक्षित असले पाहिजे.
- (ब) १सर्व विद्युत उपकरणांच्या धातूयुक्त बॉडीला अर्थ केले पाहिजे.
- (क) प्रत्येक स्विच बोर्डच्या पुढे कमीत-कमी 0.914 मीटर (3 फुट) मोकळी जागा सोडली पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (52)
विद्युत पुरवठ्यात असलेल्या उणिवासंबंधी इन्स्पेक्टरकडे करावयाच्या अर्जा संबंधी
जर वीज पुरवठा करणाऱ्याने वीज ग्राहकास विजेचा पुरवठा, त्याची विद्युत संच मांडणी अयोग्य आहे असे कारण सांगून वीज पुरवठा करणाऱ्यांने ग्राहकाचा वीज पुरवठा तोडला असेल तर, ते ग्राहक विद्युत निरिक्षकाकडे विद्युत संच मांडणी, उपकरणांची पाहणी व तपासणी करण्यासाठी अर्ज करू शकतो. जर ती उपकरणे वापरण्यास योग्य व त्यापासून कोणताही धोका नसल्याबद्दल विद्युत निरिक्षकाची खात्री झाल्यास आणि विद्युत निरिक्षकाकडून तशा सूचना आल्यास 24 तासाच्या आत वीज पुरवठा करणाऱ्याने ग्राहकास वीज पुरवठा जोडून सुरू केला पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (53)
ग्राहकाच्या उपकरणांची पाहणी व तपासणी व त्याच्या फी संबंधी
नियम 47 च्या अमलबजावणीसाठी ग्राहकास विद्युत संच मांडणी, उपकरणांची पाहणी व तपासणी बद्दलचे शुल्क पुरवठा करणाऱ्यांने भरले पाहिजे. व ह्यानंतर प्रत्येक पाहणी व तपासणी बाबतचे शुल्क ग्राहकाने भरले पाहिजे.
नियम 52 प्रमाणे विद्युत निरिक्षकाकडे अर्ज केलेला असल्यास अशा पाहणी व तपासणीचे शुल्क निरिक्षक सांगेल त्याने भरले पाहिजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (54)
ग्राहकास पुरवठा होणाऱ्या व्होल्टेजच्या मान्यते संबंधी
वीज पुरवठा करणाऱ्याने जे व्होल्टेज जाहीरपणे मान्य केले असेल, त्यामध्ये ग्राहकाची लेखी परवानगी अथवा राज्य सरकारची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कमी-जास्त बदल करता कामा नये. हा बदल खालील प्रमाणे असावा :
- (अ) कमी व मध्यम व्होल्टेज: 6%
- (ब) उच्च व्होल्टेज 6 ते 9%
- (क) अतिउच्च व्होल्टेज 12.5% पेक्षा जास्त होता कामा नये.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (55)
ग्राहकास पुरवठा होणाऱ्या ए.सी. फ्रिक्वेंसीच्या मान्यते संबंधी ग्राहकाच्या लेखी परवानगी शिवाय अथवा राज्य सरकारच्या पुर्व परवानगी शिवाय पुरवठा करणाऱ्याने अल्टरनेटिंग करंटची फिक्वेंसी मान्य फ्रिक्वेंसी मध्ये 3% पेक्षा जास्त बदल करता कामा नये.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (56)
मीटर व कट आउटच्या सीलींग संबंधी वीज ग्राहकाच्या हद्दीतील कोणत्याही कट-आऊटला किंवा तत्सम उपकरणाला पुरवठा करणारा एक किंवा दोन सील करू शकतो. हे सील वीज पुरवठा करणाऱ्याशिवाय इतर कोणालाही तोडता येणार नाही. वीज ग्राहकाने या विषयी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
ह्या नियमांचा भंग केल्यास भारतीय विद्युत नियम 1956 नियम क्रमांक 138 नुसार सील तोडणाऱ्यास 200 रुपये दंड होईल.
ह्याच प्रमाणे भारतीय विद्युत नियमापैकी कोणत्याही नियमांचा भंग केल्यास नियम क्रमांक 141 नुसार विद्युत निरिक्षकाव्यतिरिक्त नियमाचा भंग करणाऱ्यास 300 रू. पर्यंत दंड होऊन तसाच भंग पुढे चालू ठेवल्यास प्रत्येक दिवशी 50 रुपये प्रमाणे दंड होवू शकतो.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (57)
ग्राहकाच्या हद्दीतील मीटर्स, मॅक्झीमम डिमांड इंडिकेटर व तत्सम उपकरणा संबंधी
ग्राहकाच्या हद्दीत बसवलेले मीटर्स, मॅक्झीमम डिमांड इंडिकेटर व तत्सम उपकरणे जास्तीत जास्त 3 टक्के त्रुटी दाखवत असतील तर अशी उपकरणे वापरण्यास योग्य अशी समजावीत.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (58)
ग्राहकास विद्युत पुरवठा सुरू होतो त्या जागे संबंधी
अर्थ व न्युट्रल कंडक्टर अथवा ग्राहकाच्या हद्दीतील कॉन्सेन्ट्रीक केबलच्या बाहेरचा अर्थ कंडक्टर ह्या शिवाय सर्व वाहकांना जेथे पुरवठा करणाऱ्याने कट-आऊट बसवलेले असतील, त्या कट आवुटच्या बाहेर येणाऱ्या वाहकापासून ग्राहकास प्रवाह चालू झाला असे समजावे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (59)
विद्युत पुरवठा बंद पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी व बंद पडल्याची सूचना
वीज पुरवठा करणाऱ्याने वीज पुरवठा बंद पडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्याची माहिती पुरवठा धारकास समजल्यानंतर, त्वरीत त्याची माहिती योग्य त्या नमुन्यात विद्युत निरिक्षकाकडे कळवली पाहिजे. काही कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित करावयाच्या झाल्यास, असा पुरवठा किती वेळ खंडित राहील या संबंधीची सूचना धोकादायक परिस्थिती व्यतिरिक्त इतर वेळी 24 तास अगोदर ग्राहकाना दिली पाहिजे. कोणत्याही ग्राहकाने असा प्रवाह खंडीत होण्यास हरकत घेतल्यास विद्युत निरिक्षकाच्या परवानगीशिवाय त्याचा प्रवाह खंडीत होऊ देता कामा नये. परंतु त्यास निरीक्षकाने घातलेल्या अटी घालाव्यात.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (60)
विद्युत विरोधी आवरणांचा रजिस्टंस पाहण्या संबंधी
- विद्युत विरोधी आवरणाचा विद्युत विरोध बघण्यासाठी, कमी व मध्यम न्टेज असलेले विद्युत वाहक vec epsilon , त्यात वाढ, दुरूस्ती अथवा बदल यासाठी मुख्य सप्लाय लाईनपासून तोडले असतील तर असे वाहक, वीज पुरवठा धारकाने नियम 48 मध्ये सांगितलेली कसोटी व तपासणी करण्यासंबंधी अर्ज केल्याशिवाय मुख्य सप्लाय लाईनला जोडू नये.
- विद्युत वाहक म्हणून जर कान्सन्ट्राक केबलचा उपयोग केलेला असेल तर त्या कबलच्या परिघाच्या सर्वात जवळ असणाऱ्या वाहकांना (आर्मरींगला) अर्थ करावे.
- D.C. थ्री. वायर पध्दतीत मधला वाहक (मिडल कंडक्टर) हा फक्त, जनरेटरच्या ठिकाणी अर्थ करावा.
- अल्टरनेटींग करंट पध्दतीत अर्थ केलेले निरनिराळे अर्थड् कंडक्टर हे विद्युत दृष्ट्या एकमेकांस जोडावेत. विद्युत वाहकांना (कंडक्टर्सना) अशा अर्थड् कंडक्टर्सचे बाहेरील बाजूने संरक्षण असावे.
- प्रत्येक जनरेटर, मोटार, ट्रान्सफॉर्मर्स तसेच विद्युत शक्ति नियमित व नियंत्रित करणारी साधने व विद्युत शक्तीचा उपयोग करणारी सर्व यंत्रे यांचे सर्व धातूंचे भाग (विद्युत वाहक सोडून) दोन वेगवेगळ्या ठिकाणी अर्थ कंडक्टरने योग्य प्रकारे जोडावेत. तसेच विद्युत वाहक व विद्युत उपकरणे यांना संरक्षण देणारी सर्व धातूची आवरणे हे सुध्दा अर्थला जोडावे.
- विद्युत संच मांडणीतील थ्री पीन सकिटच्या तिसऱ्या पिनला योग्य प्रकारे अर्थला जोडावे. नियम (70) कंडेन्सरच्या चार्जिंग संबंधी : सर्किट मधील विद्युत प्रवाह खंडीत झाल्यानंतर सर्व कंडेन्सर हे, ताबडतोब डिस्चार्ज होतील अशी व्यवस्था केली पाहीजे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (71)
जास्त व्होल्टेज असलेल्या नियॉन साईन ट्युब संबंधी
- कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस जाता येणार नाही अशा ठिकाणी सुरक्षितपणे ह्या ट्युबची उभारणी केली पाहिजे.
- ट्युबच्या इन्स्टॉलेशनमध्ये दोन मेन स्विच बसवले पाहिजे. त्यापैकी एक स्विच इमारतीच्या आत व एक स्विच बाहेर बसवला पाहिजे. बाहेरील स्विचला लाल रंग लावलेला असावा.
- ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी (एल.टी.) व सेकंडरी (एच.टी.) एकमेकापासून चांगल्या प्रकारे इन्सुलेटेड केलेले असावे.
- सर्व जिवंत भाग वातावरण व आगीपासून चांगले सुरक्षित राहतील असे बसवावे.
- ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी व कोअर चांगल्या प्रकारे अर्थ करावे.
- सर्व सर्किट ट्रान्सफॉर्मर मार्फतच चालू झाले पाहिजे.
- सर्व सर्किट एकाच वेळी कार्य करीत असेल तर प्रायमरी लोड 1000 व्होल्ट – अँपीअर पेक्षा जास्त असू नये. त्यापुढील लोडला वेगळे सब सर्किट द्यावे.
- असे इन्स्टॉलेशन इमारतीच्या बाहेर उभारलेले असेल तर, एक स्वतंत्र फायर लिंक स्विच जमिनीपासून 2.5 मीटर उंचीवर लावलेला असावा. 9) अशा इन्स्टॉलेशनची उभारणी व उपयोग करण्यापूर्वी तेथील मालकाने किमान 15 दिवस अगोदर लेखी सुचना विद्युत निरीक्षकाकडे दिली पाहिजे.
ओव्हरहेड लाईनसंबंधी नियम
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (74)
विद्युत ओव्हर हेड लाईनच्या मटेरिअल व क्षमते संबंधी
- ओव्हर हेड लाईन कंडक्टरची तुटण्याची क्षमता (ब्रेकींग कॅपॅसिटी) प्रत्येकी 317.51 कि. ग्रॅ. पेक्षा जास्त नसावी.
- जेथे व्होल्टेज कमी असेल व स्पॅन 15.24 M असेल, तो स्पॅन मालकाच्या किंवा ग्राहकाच्या हद्दीत असेल अशा ठिकाणी 136.08 कि. ग्रॅ. पेक्षा जास्त ब्रेकींग कंपरिटी असलेले वाहक वापरावे.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (77)
ओव्हर हेड लाईनचा सर्वात खालचा कंडक्टर व जमीन यामधील कमीत-कमी अंतरा (ग्राउंड क्लिरंस) संबंधी
- सर्व्हस लाईन व ओव्हरहेड लाईनचा कंडक्टर जेथे रस्ता ओलांडून (क्रॉस करून) जात असेल अशा ठिकाणी त्यांचे जमीनीपासून अंतर खालील प्रमाणे असावे : अ) कमी व मध्यम व्होल्टेज 5.791 मीटर (19 फुट) ब) जास्त व्होल्टेज 6.096 मीटर (20 फुट)
- सर्व्हीस लाईनसह ओव्हरहेड लाईनचा कोणताही कंडक्टर जो रस्त्याच्या बाजुने रस्त्याला समांतर जात असेल तर, त्याची जमीनीपासूनची कमीत कमी उंची खालील प्रमाणे असावी : अ) कमी व मध्यम व्होल्टेज : 5.48 मीटर (18 फुट) ब) जास्त व्होल्टेज : 5.791 मीटर (19 फुट)
- शहराच्या बाहेरून जाणाऱ्या ओव्हर हेड लाईन व सर्व्हीस लाईन उभारलेली असेल तेथील कोणत्याही कंडक्टरची जमीनीपासूनची उंची खालील प्रमाणे असावी :अ) कमी, मध्यम व जास्त व्होल्टेज असलेल्या उघड्या लाईन्स (11 के.व्ही. पर्यंत व 11 के.व्ही. सह) – 4.572 मीटर (15 फुट) ब) कमी, मध्यम व जास्त व्होल्टेज असलेल्या इन्सुलेटेड लाईन्स (11 के.व्ही. पर्यंत व सह) 3.96M (13 फुट) क) 11 के.व्ही. पेक्षा जास्त व्होल्टेजच्खा लाईन्स – 5.182 मीटर (17 फुट)
- अतिशय जास्त व्होल्टेज असलेल्या लाईनच्या बाबतीत त्याचे जमीनीपासून कमीत कमी अंतर 5.182 मीटर (17 फुट) असावे. रस्त्याच्या समांतर जाणाऱ्या लाईनच्या बाबतीत हे अंतर 6.096 मीटर (20 फुट) असावे. 33 के.व्ही. च्या पुढील लाईन्स ह्या दर 33 के. व्ही. ला 0.305 मीटर (1 फुट) या प्रमाणे उंची वाढवावी.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (78)
लाईन कंडक्टर व ट्रॉली लाईन यामधील अंतरा संबंधी
कंडक्टर व ट्रॉली लाईन यामधील अंतर जेथे दोन लाईन्स एकमेकांना क्रॉस होत असतील : जेथे ओव्हर हेड लाईन, ट्रोम वे किंवा ट्रॉली बस यांच्या वायरला छेदन जात असेल, अशा ठिकाणी ओव्हर हेड लाईनचे कंडक्टर्स व ट्रॉम-वे किंवा ट्रॉली बस यामध्ये कमीत-कमी अंतर खालील प्रमाणे असाव:
- अ) कमी व मध्यम व्होल्टेजचा लाईन्स 1.219 मीटर (4 फुट) व जेथे लाईन कंडक्टर इन्सुलेटेड असतील तर त्या ठिकाणी कमीत-कमी 0.610 मीटर (2 फुट) असावे.
- ब) 11 के.व्ही. पर्यंतच्या व्होल्टेजच्या लाईन्स 1.829 मीटर (6 फुट)
- क) 11 के.व्ही. पेक्षा जास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स 2.439 मीटर (8 फुट) ड) अतिशय जास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स 3.048 मीटर (10 फुट)
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (79)
कमी व मध्यम व्होल्टेज असलेल्या लाईन्स, सर्व्हिस लाईन व इमारत यामधील अंतरा संबंधी
कमी व मध्यम व्होल्टेज असलेल्या लाईन्स आणि सर्व्हीस लाईन्स यांचे इमारती पासूनचे अंतर
- जेथे कमी व मध्यम व्होल्टेजच्या ओव्हरहेड लाइनचा जास्तीत जास्त सँग (झोळ) धरून इमारती पासूनचे कमीत-कमी अंतर खालील प्रमाणे असावे :
- अ) सपाट छत, उघडी गॅलरी, व्हरांड्याचा छत अशा ठिकाणी लाईन इमारतीवरून जात. असेल तेथे, त्या इमारतीच्या सर्वात उंच असलेल्या भागापासून उभे अंतर 2.439 मीटर (8 फुट) असावे.
- ब) जेंव्हा लाईन इमारती जवळून जात असेल अशा ठिकाणी इमारती पासून समांतर अंतर 1.219 मीटर (4 फुट) असावे.
- जेंव्हा लाईन उतरता छत असलेल्या इमारतीवरून जात असेल अशा ठिकाणी उभे अंतर 2.439 * 4fcx(8yc) असावे आणि अशा छताच्या इमारती जवळून लाईन जात असेल तर त्या ठिकाणी समांतर अंतर 1.219 मीटर (4 फुट) असावे.
वरील नियमाप्रमाणे इमारत व लाईन यामधील अंतर कमी ठेवावे लागत असेल तर अशा ठिकाणचे लाईन कंडक्टर्स योग्य प्रकारे इन्सुलेटेड करून न्यावेत.
भारतीय विद्युत नियम 1956 – नियम (80)
जास्त व अती जास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स व इमारत यामधील अंतरा संबंधी
33 के.व्ही. पेक्षा जास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स यांचे इमारती पासून उभे अंतर 3.658 मीटर (12 फुट) असावे व त्यापुढील अतिउच्च व्होल्टेज असलेल्या लाईन्स 3.658 मीटर अधिक दर 33 के.व्ही. ला 0.305 मीटर (1 फुट) या प्रमाणे असावे. ईमारती पासून समांतर अंतर हे 11 के. व्ही. च्या लाईनसाठी 1.219 मीटर (4 फुट), 11 के.व्ही. व 33 के. व्ही. पेक्षा कमी व्होल्टेजच्या लाईन्स 1.829 मीटर (6 फुट) असावे आणि 33 के.व्ही. पेक्षा जास्त व्होल्टेजच्या लाईन्स 1.829 मीटर अधिक त्यापुढे दर 33 के. व्ही. ला 0.305 मीटर (1 फुट) याप्रमाणे असावे.
हे ही वाचा..